
Viral video from Bangalore:
कुणावर कधी कशी वेळ येईल ते त्या वेळेलाच माहित असत हे पुरेपूर खर ठरलं एका इंजिनिअर सोबत.एकेकाळचा सुशिक्षित इंजिनिअर बंगळूर सारख्या शहरात आज चक्क भीक मागतोय.

ही स्टोरी इंस्टाग्राम च्या @sharath_yuvaraja_officia या हॅण्डल वरून शेअर झाले.
शेअर केलेल्या पहिल्या पार्ट मधे अस सांगण्यात येतय की तो एक इंजिनिअर आहे ज्याने आपल MS frankfurt germany मधून पूर्ण केल जो कधीकाळी Global Village tech park म्हणजेच सध्याचे Sattva Global city या tech park मध्ये एका नामांकित IT कंपनीमध्ये प्रॉडक्ट इंजिनिअर म्हणून कामाला होता.
जॉब quit करायच्या आधी त्याच्या आई वडीलांच्या निधनानंतर आणि गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर तो व्यसनाधीन झाला आणि सध्या जगण्यासाठी रस्त्यावर भीक मागतोय.
ज्या अकाउंट वरून व्हिडिओ शेअर झाला त्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यक्ती काही दिवसापूर्वी मध्यधुंद अवस्थेत बंगळुरूच्या रस्त्यावर दिसला.
दुसऱ्या पार्ट मध्ये तो meditation,David Hume ची पुस्तके,अल्बर्ट आईनस्टाईन,brain’s hippocamus आणि न्यूटन बद्दल बोलताना दिसला.
तिसऱ्या पार्ट मध्ये तो आपली शैक्षणिक माहिती आणि तो इकडे कसा आला ते सांगताना दिसला.तसेच त्याने धर्म आणि जातीने आपल आयुष्य असं बनवलं असे सांगितलं आहे.
ज्या अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर झाला त्यांनी NGO कडे मदत मागितली आहे असं ही सांगितलं आहे.