
Pushpa 1:” The rise” या चित्रपटाने अगदी लहानासोबतच थोर प्रेक्षकांच्या मनाला सुद्धा भुरळ घातली होती.तशीच भुरळ घालायला Pushpa 2:”The rule” आता सज्ज आहे.

सुकुमार दिग्दर्शित Pushpa 2: The rule हा २०२४ मधील सगळ्यात जास्त प्रतीक्षेत असलेल्यांपैकी एक आहे.त्यासोबतच खूप मोठे बजेट असल्याने प्रेक्षकांच्या भरघोस अपेक्षानी भरलेला आहे.
प्रेक्षकांची उत्सकता आता शिगेला पोहोचली आहे.Pushpa 2 हा चित्रपट येत्या ६ डिसेंबर ला रिलिज होतोय.पण रिलिज होण्या आधीच न्यूज १८ च्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने ९०० कोटी रुपयांची धमाकेदार कमाई केले.
प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतानाच चित्रपटाने डिजिटल आणि सेटलाईट राइट्सना अजून पर्यंतच्या विक्रमी किमतीला विकून ९०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Pushpa 2 budget:
असे सांगितलं जातय की Pushpa 2:The rule या चित्रपटाच बजेट ५०० कोटी रुपये आहे.चित्रपटात Allu Arjun,Rasmika Mandana आणि Fahadh Faasil लीड रोलमध्ये आहेत तर चित्रपटाच संगीत Devi Shri Prasad यांनी कंपोज केलेलं आहे.
Pushpa 2 चा श्वास रोखणारा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहीलात का?नसेल तर इथे पहा
Pushpa 1 :The rise या चित्रपटासाठी Devi Shri Prasad यांना बेस्ट म्युझिक दिल्याबद्दल आणि Allu Arjun यांना बेस्ट ॲक्टर असे नॅशनल अवॉर्ड सुद्धा भेटले.
असे बोलल जातय की Allu Arjun ने थलपती विजयला मागे टाकत Pushpa 2 : The rise या चित्रपटासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांच मानधन घेऊन भारतातील सगळ्यात महागडा अभिनेता असल्याचा बहुमान मिळवला आहे.यापूर्वी थलपती विजय ने “थलपती 69” साठी २७५ कोटी रुपये मानधन घेतल होत.