
या वर्षी कार्तिक पौर्णिमा १५ नोव्हेंबर म्हणजेच येत्या शुक्रवारी आहे.दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही गुरू नानक जयंती कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच १५ नोव्हेंबरला सर्वत्र साजरी होत आहे.

परिचय:
- गुरू नानक जयंती हा शीख धर्मातील एक खूप महत्वाचा सण मानला जातो.
- गुरू नानक हे शीख धर्माचे founder तसेच पाहिले गुरू मानले जातात.
- गुरू नानक यांचे विचार आणि शिकवण यांची आठवण या दिवशी केली जाते.
Guru nanak jaynti 2024:
गुरू नानक हे शीख धर्माचे पाहिले गुरू मानले जातात.त्यांच्या जन्मदिनी जगभरात गुरू नानक जयंती साजरी केली जाते.यावर्षी त्यांचा ५५५ वा वाढदिवस साजरा होत आहे.
गुरू नानक जयंती “गुरू पर्व” आणि “गुरू प्रकाश पर्व”म्हणून पण साजरी केली जाते.
गुरू नानक जयंतीची तारीख आणि वेळ:
हिंदू कॅलेंडर च्या तिथि नुसार १५ नोव्हेंबर रोजी पौर्णिमेची सुरवात ६.१९ मिनिटानी होत असून १६ नोव्हेंबरला २.५८ मिनिटानी संपत आहे.
गुरू नानक जयंतीचा इतिहास:
असे मानले जाते की शीख समुदाय १० गुरूंनी दिलेल्या विचार आणि शिकवणवर चालतो.त्यातील गुरुनानक हे पाहिले गुरू मानले जातात ज्यांनी शीख धर्माचा मुख्य पाया रचला.
गुरू नानक जयंती हा सण देव गुरू नानक यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.त्यांचा जन्म १४५९ मध्ये लाहोर जवळील तलवंडी(पंजाब)मध्ये झाला.
त्यांनी मानवतेला एकतेचा संदेश दिला.त्यांना लहान वयापासूनच अध्यात्माचे ज्ञान होते.
गुरू नानक देव यांचे विचार आणि शिकवण:
त्यांच्या विचार आणि शिकवणीतून करोडो लोकांना प्रेरणा मिळाली.त्यांचे विचार आणि शिकवण गुरू ग्रंथ साहिब मध्ये पाहायला मिळतात.
- एकता आणि समता:गुरू नानक यांनी सर्व मानव समान आहेत असे शिकवलं.
- देव एकच आहे:त्यांनी “एक ओंकार” म्हणजेच देव एकच आहे असे प्रतिपादन केले.
- सेवा आणि मानवता:समाजातील गरजू लोकांची सेवा करणे हेच परम कर्तव्य आहे असे सांगितले.
- श्रम आणि नीतिमत्ता:निष्ठेने श्रम करा ,प्रामाणिकपणा आणि सत्याची साथ हे जीवनाचे ध्येय ठेवा.
- स्त्री चा सन्मान:त्यांनी महिलांना समाजात समान हक्क असावेत असा आग्रह केला.
गुरू नानक जयंती निमित्ताने गुरूद्वारामध्ये विशेष धार्मिक प्रवचन ,कीर्तन तसेच गुरू ग्रंथ साहिब चे वाचन केले जाते.तसेच लंगर (भोजन) प्रसाद देऊन गरजू लोकांना मदतीचा हात दिला जातो.