
X(Twitter): X (Twitter) प्लॅटफॉर्म Elon Musk ने खरेदी केल्यानंतर त्यात कमालीचे बदल घडवले.X (Twitter) हा जगभरातील लोकांना संवाद असेल किंवा कोणतीही माहिती मिळवायची असेल नाहीतर एखादा ट्रेण्ड सर्च किंवा शेअर करण्याचा एक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.आधी फ्री असलेला प्लॅटफॉर्म आता आपल्याला सबस्क्रिप्शन चे ऑप्शन्स सुद्धा देतो.

X (Twitter) वरती Elon Musk ने भारतासाठी दोन सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केले होते.ज्या मध्ये एक स्वस्त आणि एक त्यापेक्षा थोडासा महाग होता.सध्या X (Twitter)चे ३ सबस्क्रिप्शन प्लॅन्स सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
X Basic Subscription plan:
X (Twitter) चा basic subscription plan २१५.८७ रुपये प्रति महिना आहे.हा X (Twitter) चा सध्या सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे.जो वार्षिक बिलिंग केल तर ११% आपल्याला सुट मिळेल.
X Premium Subscription plan:
X Premium Subscription plan ची ३४० रुपये प्रति महिना आहे तर वर्षाची रक्कम ४०८० रुपये इतकी होते.
X Premium Plus Subscription plan:
X Premium plus Subscription plan 680 रुपये प्रति महिना आहे तर ८१६० रुपये वार्षिक प्लॅन आहे.
पण तुम्हाला माहीत आहे का हेच प्रीमियम सबस्क्रिप्शन तुम्ही आता तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला भेट म्हणून पण देऊ शकता.त्याची किंमत फक्त ८४ डॉलर म्हणजेच ७०९५ रुपये आहे.
Twitter हे फक्त एक सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म नसून ज्ञान वाढवण्यासाठी,संवाद साधण्यासाठी तसेच व्यवसायिक उद्दीष्ट साधण्याचं एक उत्तम आणि प्रभावी साधन आहे.तुम्ही तुमच्या बजेट नुसार तुमचा सबस्क्रिप्शन प्लॅन निवडू शकता .