
Bank Holidays:तुम्हाला माहित आहे का RBI च्या नियमानुसार बँकेला महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते.पण काही महिन्यांमध्ये पाचवा शनिवार ही कधी कधी येतो तर तुम्हाला प्रश्न पडत असेलच पाचव्या शनिवारी पण बँकांना सुट्टी असते का?तर थांबा महिन्याच्या पहिल्या,तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँकांना सुट्टी नसते.बँक या दिवशी कार्यरत असतात.

बँकांना सुट्टी असलेल्या दिवशी ऑनलाइन transactions करू शकता.तुम्ही ऑनलाईन असलेल्या सगळ्या सेवांचा सुट्टीच्या दिवशीही वापर करू शकता.UPI transactions,Internet बँकिंग,मोबाईल बँकिंग आणि अन्य digital सेवा यावर bank holidays चा काही प्रभाव पडत नाही.
पण डिसेंबर महिन्यात जर तुमचे एखादे काम असेल तर तुम्ही बँक holidays चे कॅलेंडर नक्की पहा.कारण नोव्हेंबर प्रमाणे डिसेंबर मध्येही १७ दिवस बँक बंद राहायची शक्यता आहे.तुमचे चेकबुक किंवा पासबुक संबंधित काही काम असेल तर सुट्ट्यांचा प्रभाव त्यावर पडू शकतो.ते काम रखडू शकते.
RBI च्या नुसार दुसरा शनिवार चौथा शनिवार आणि प्रत्येक आठवड्याला येणारा रविवार अस पकडुन एकूण १७ दिवस सुट्टी डिसेंबर मध्ये बँकांना असणार आहे.या सुट्यांमध्ये काही सुट्ट्या अशा आहेत ज्या पूर्ण देशात लागू होतात तर काही अशा आहेत ज्या फक्त ठराविक राज्यापुरता मर्यादित असतात.
December 2024 Bank Holidays List:
- १ डिसेंबर २०२४: रविवार,जागतिक एड्स दिवस
- ३ डिसेंबर २०२४:मंगळवार,सेंट फ्रान्सिस जे,गोवा राज्य बँक holiday
- ८ डिसेंबर २०२४:रविवार
- १० डिसेंबर २०२४ :मंगळवार , मानव अधिकार दिवस
- ११ डिसेंबर २०२४: बुधवार,युनिसेफ जन्मदिवस,देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
- १४ डिसेंबर २०२४:दुसरा शनिवार
- १५ डिसेंबर २०२४:रविवार
- १८ डिसेंबर २०२४: बुधवार,गुरू घासिदास जयंती, चंदीगड
- १९ डिसेंबर २०२४:गुरुवार,गोवा मुक्ती दिन,गोवा बँक holiday
- २२ डिसेंबर २०२४:रविवार
- २४ डिसेंबर २०२४:मंगळवार,गुरू तेज बहादुर शहीद दिवस, ख्रिसमस ईव्ह , मिझोरम मेघालय,पंजाब,चंदीगड
- २५ डिसेंबर २०२४:बुधवार, ख्रिसमस
- २६ डिसेंबर २०२४:गुरुवार,सगळीकडे बँकांना सुट्टी
- २८ डिसेंबर २०२४:चौथा शनिवार
- २९ डिसेंबर २०२४:रविवार
- ३० डिसेंबर २०२४:सोमवार,तमु लोसर,सिक्कीम
- ३१ डिसेंबर २०२४:मंगळवार,मिझोरम
या दिवशी बँकांना सुट्टी जरी असली तरी ग्राहक बँक वेबसाईट किंवा ॲप चा वापर करून पैसे ट्रान्स्फर ,बिल भरणे,रिचार्ज किंवा आपला बॅलन्स चेक करू शकतात.
तसेच जर कॅश ची फारच गरज असेल तर तुम्ही ATM छा सुद्धा वापर करू शकता.
बँक मध्ये जाण्याची गरजच असेल तर ग्राहकांनी बँक हॉलिडे कॅलेंडर पाहूनच बँक मध्ये जावे.