
क्रिकेट हा फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील लोकप्रिय आणि उत्साहवर्धक एक खेळ आहे.महान खेळाडूंच्या कथा,एकदम थरारक असे सामने,आणि जिंकण्या हरणाऱ्या आठवणीनी भरलेल्या या खेळाने प्रत्येक थोरा मोठ्यांच्या मनाला नेहमीच भुरळ पाडलेली आपण नेहमीच पाहतो.सचिन तेंडुलकर,महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली हे क्रिकेट मधील असे खेळाडू आहेत ज्यांनी एक स्वतःच ब्रँड तयार केलं.यांची लोकप्रियता भारतात तर लक्षणीय आहे पण भारताच्या बाहेरही खूप फॅन फोलोईंग असलेली आपण पाहतो.प्रत्येकाच्या नावावर काही ना काही नवे रेकॉर्डस आहेत.पण तरीही यामधील एकही खेळाडू सगळ्यात श्रीमंत खेळाडू नाही.

जर यातील एकही खेळाडू सगळ्यात श्रीमंत खेळाडू नाही तर मग तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की जगातील सगळ्यात श्रीमंत खेळाडू नक्की आहे तरी कोण.
तर जगातील सगळ्यात श्रीमंत खेळाडू आहे आर्यमान बिर्ला (Aryaman Birla).ज्याने सचिन तेंडुलकर,महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीला सुद्धा मागे टाकल आहे.आर्यमान बिर्लाची एकूण मालमत्ता ही सुमारे ७०००० कोटी इतकी आहे.
आर्यमान बिर्ला हा करोडपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे.२०२३ मध्ये आर्यमानची आदित्य बिर्ला ग्रुपच्या आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड(ABFRL) च्या डायरेक्टर पदाला नियुक्ती झाली.या सोबतच आर्यमान बिर्ला हा आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कोपरेशन (Aditya Birla Management Cooperation)आणि ग्रासिम इंडस्ट्रीज(Grasim Industries) च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पैकी आहे.पण व्यवसाय या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्या आधी आर्यमान याने आपल करिअरची सुरवात ही क्रिकेट पासून केली होती.त्याच्या नावावर ” फर्स्ट क्लास सेंच्युरी” चा रेकॉर्ड देखील आहे.
आर्यमान बिर्ला चे क्रिकेट करिअर(Cricket Career of Aryaman Birla):
आर्यमान बिर्ला चा जन्म मुबईमध्ये १९९७ साली झाला होता.आपल्या क्रिकेट करियरची सुरवात ही त्याने मध्य प्रदेश मधून केली होती.जिथे बिर्ला ग्रुपच्या सिमेंट युनिटचे हेडक्वार्टर देखील आहे.आर्यमानची पहिली मॅच ही मध्य प्रदेश आणि ओडिसा यामधील रंजी २०१७ मध्ये खेळली होती.तसेच २०१८ मध्ये आयपीएल साठी राजस्थान रॉयल्स मध्ये गेला.
आर्यमान ९ मॅच मध्ये feature झाला.त्या ९ मॅच मध्ये त्याने ४१४ रन केले.
क्रिकेट करिअरची सुरवात चांगली होऊनही अर्यमान ने २०१९ साली क्रिकेटला काही कारणाने रामराम केला.