
Vivo X200 Series:Vivo X200 Series ने नुकताच ग्लोबल मार्केट मध्ये धमाका केल्यानंतर आता Vivo X200 आणि Vivo X200 pro भारतात लवकरच लाँच होत आहे. Malaysia मध्ये झालेल्या X200 series Launch नंतर Vivo ने Vivo X200 series भारतात लॉन्च करण्याचं जाहीर केल आहे.कोणत्या तारखेला लाँच करणार ते मात्र अजून कंपनीने सांगितलं नाही.

Vivo X200 Series:
Vivo ने सांगितलं की Vivo भारतात फक्त Vivo X200 आणि Vivo X200 Pro लाँच करत आहे Vivo X200 Pro Mini नाही.तर चीन मध्ये Vivo ने Vivo X200,Vivo X200 Pro आणि Vivo X200 Pro Mini सुद्धा लाँच केला आहे.
एवढंच नाही तर Vivo X200 Pro हा भारतातील पहिला असा स्मार्टफोन आहे ज्याला 200 MP ZEISS APO telephoto camera आहे.
Vivo X200 series मध्ये तुम्हाला Flagship Mediatek chipset आणि High end camera सोबत अजून बरच काही भेटून जाईल.
India Launch Vivo X200 Series :
Vivo Smartphone brand ने नुकताच आपल्या official X handle(Twitter) वर लाँच केल्या जाणाऱ्या Vivo X200 Series चा टीझर लाँच केले ज्यामधे ,” Coming Soon ” लिहिलं गेलं होत.
या सोबतच Vivo ने असेही सांगितलं की Series मधील फक्त Vanilla आणि Pro variant च भारतात लाँच करण्यात येतील.
Series Smartphone तीन कलर मध्ये उपलब्ध असणार आहेत.
Cosmos Black आणि Titanium Gray सोबतच ही series Natural Green या कलर मध्ये सुद्धा लाँच होत आहे.तर Vivo X200 Pro च Titanium Gray या कलर मध्ये मार्केटिंग केल जाईल.
चीन मध्ये Vivo X200 आणि Vivo X200 Pro हे Carbon Black, Moonlight White, Sapphire Blue आणि Titanium Gray या कलर मध्ये लाँच केलेत.
India Launch Vivo X200 Series Specifications (Expected):
चीन मध्ये लाँच केल्याप्रमाणे Vivo X200 Series मधील Vivo X200 आणि Vivo X200 Pro चे specifications सारखेच असावेत असा अंदाज आहे.दोन्हीही स्मार्टफोन मध्ये Mediatek’s 3nm Dimensity 9400 chip सोबतच 16 GB Ram.Vivo X200 ला6.67 इंच आणि Vivo X200 Pro ला 6.78 इंच LTPS AMOLED display असतील.Refresh rate 120Hz असेल तर peak brightness 4500nits असू शकेल.