
‘Rockstar girl’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर्गिस फाखरी या अभितनेत्रींच्या बहिणीला न्यूयॉर्क मध्ये अटक करण्यात आली आहे.

आलिया फाखरी हिच्यावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा खुन केल्याचा आरोप आहे.४३ वर्षीय आलिया हिने लावलेल्या आगीमध्ये अलियाचा एक्स बयफ्रेंड आणि त्याची नवीन मैत्रीण या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
रिपोर्टनुसार आलियाने तिच्या एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जाकॉब्स आणि त्याच्या नवीन मैत्रिणीचे नाते सहन न झाल्याच्या रागात ते दोघेही असलेल्या बिल्डिंगला आग लावली.त्या आगीमध्ये दोघांचाही घुसमटून आणि हरोळून मृत्यू झाला आहे.
रिपोर्टर नुसार २ नोव्हेंबर ला सकाळी ६ वाजता आग लावण्या आधी आलिया बिल्डिंग समोर येऊन ओरडली होती की,”आज तुम्ही सगळे मारणार आहात.”आलिया ने आग प्रवेश दारावरच लावली ज्यामुळे घरात असलेले लोक बाहेर येऊ शकले नाहीत.
आलियाला अटक करण्यात आली होती आणि तिला क्रिमिनल कोर्टमध्ये जामीन मंजूर झाला नव्हता.District Attorney मेलिंडा यांनी सांगितलं की,”आलिया ने लावलेल्या आगीमध्ये दोन लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.”
नर्गिसच्या आईने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,”मला नाही वाटत आलिया अस काही करू शकेल.ती नेहमीच सगळ्यांची काळजी घेणारी आणि सगळ्यांना मदत करणाऱ्यांपैकी आहे.”