
JEE Mains 2025: National Testing Agency (NTA) JEE (Joint Entrance Examination)Mains 2025 ची अर्ज करायची प्रक्रिया लवकरच बंद करत आहे.

JEE (Joint Entrance Examination)Mains ही आपल्या देशभरातील अभियांत्रिकीच शिक्षण घेऊ वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाची आहे. JEE Mains द्वारे देशातील IIT,NIT सारख्या प्रतिष्ठित कॉलेज तसेच सरकारी तथा प्रायव्हेट अभियांत्रिकी महािद्यालयात प्रवेश मिळतो.
JEE mains ला अर्ज करायच्या अंतिम तरखेसाठी अजून काहीच दिवस बाकी आहेत.ज्या विद्यार्थ्यांना अजूनही अर्ज करायचे असतील त्यांनी अर्ज करू शकतात.
JEE mains 2025 ला अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी आहे?
JEE mains 2025 ला अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर पर्यंत आहे.
JEE mains 2025 साठी अर्ज कुठे करावा?
JEE mains 2025 चा अर्ज अधिकृत वेबसाईटवरच करावा लागतो.त्यासाठी अर्जदाराने https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
JEE mains 2025 साठी अर्ज कसा करावा? नोंदणी प्रक्रिया:
Step 1:JEE Mains च्या https://jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Step 2: Online Application Form For JEE (mains ) या लिंक वर क्लीक करा.
Step 3:संकेत स्थळावर New Registration या लिंकवर क्लिक करून आपले नविन खाते तयार करा.त्यासाठी वैयक्तिक माहिती,तुमची ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरची आवश्यकता असेल.
Step 4:आवश्यक असलेले credentials देऊन तुमच्या account ला लॉगिन करा.
Step 5: अर्ज (Application form) भरा.
Step 6: Application Fee भरा.तुम्ही क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा/UPI चा उपयोग करू शकता.
Step 7:भरलेल्या फॉर्म ला डाऊनलोड करा आणि printout घ्या.
महत्वाची सूचना:
- अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास तुम्हाला परीक्षा प्रक्रियेतून वगळले जाऊ शकते .त्यामुळे सगळी माहिती अचूक भरा.
- वेळोवेळी अधिकृत सूचना व मार्गदर्शक तपासा.
शेवटच्या काही टिप्स:
- अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र,फोटो,स्वाक्षरी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र तयार ठेवा.
- अर्ज भरताना कोणतीही गडबड किंवा गोंधळ टाळा.
- वेळेत प्रक्रिया पूर्ण करा.